हरंगुळ खुर्द येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:38+5:302021-06-02T04:16:38+5:30
लातूर तालुक्यातील हरंगुळ खुर्द येथे खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीच्या माध्यमातून कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे व आरसीएफचे जिल्हा प्रतिनिधी निखिल ...

हरंगुळ खुर्द येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
लातूर तालुक्यातील हरंगुळ खुर्द येथे खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठकीच्या माध्यमातून कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे व आरसीएफचे जिल्हा प्रतिनिधी निखिल मानकर यांनी हरंगुळ खुर्द येथील मनोहर मुलगावे यांच्या शेतात स्पर्धेच्या निमित्ताने सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. बीज प्रक्रिया करतानाचा स्वतःचा स्पष्ट आवाजात व्हिडिओ बनवून दिलेल्या लिंकवर ३० जूनपर्यंत पाठवावा. पहिल्या शंभर शेतकऱ्यांना बायोला हे जैविक जीवाणूसंवर्धक मोफत दिले जाणार आहे. याशिवाय विविध स्तरावर बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी सहायक सूर्यकांत लोखंडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमास मनोहर झुंजे, उमाकांत भुजबळ, मारुती मुलगावे, गणपती होळकर, रमाकांत गावकरे, महादेव शेवाळे, मनोहर भुजबळ, मनोहर मुलगावे, शंकर मुलगावे, महेश लहाने आदींसह शेतकरी उपस्थित होते.