कर्ज, फायनान्सची वसुली थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST2021-05-23T04:19:26+5:302021-05-23T04:19:26+5:30
सर्वसामान्य नागरिकांना विवाह, शेतीची कामे, घर बांधकामासाठी शासकीय अथवा खासगी बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. सध्या कोरोनाच्या संकटामुळे गरिबांना घर ...

कर्ज, फायनान्सची वसुली थांबविण्याची मागणी
सर्वसामान्य नागरिकांना विवाह, शेतीची कामे, घर बांधकामासाठी शासकीय अथवा खासगी बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. सध्या कोरोनाच्या संकटामुळे गरिबांना घर खर्च भागविणे अवघड झाले आहे. अशातच कर्जाची घेतलेली रक्कम परतफेड करणे कठीण झाले आहे. खासगी फायनान्स कंपनीचे कर्मचारी वसुलीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे गरीब संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सक्तीची वसुली काही काळासाठी थांबवावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर इतिहास कांबळे, अनिल गायकवाड, कुमार मसुरे, अनिल सोनकांबळे, एन. डी. मसुरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.