शासकीय वसतिगृह सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST2021-02-12T04:19:04+5:302021-02-12T04:19:04+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू करण्यास सूचना देण्यात आल्या आहेत. १५ ...

शासकीय वसतिगृह सुरू करण्याची मागणी
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू करण्यास सूचना देण्यात आल्या आहेत. १५ फेब्रुवारीपासून अन्य उर्वरित शिक्षण सुरू होणार आहे. एकीकडे शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत, पण वसतिगृह सुरू झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य गावातून येण्यासाठी, शहरात राहण्यासाठी व भोजनासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. हा खर्च प्रत्येक विद्यार्थ्याला परवडणारा नाही. त्यामुळे शासनाने वसतिगृह सुरू करावेत, अशी मागणी अभाविपच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या वसतिगृहात कोविड विलागीकरण केंद्र होते, तिथे निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख प्रणव नागराळे, सह शहर मंत्री सागर वाकसे, अनिकेत तेली, विशाल गुलबुले, प्रसाद राचट्टे, गणेश मुळे, सूरज वर्मा, शुभम पाटील, महेश मोरे, परमेश्वर वडगावे आदी उपस्थित होते.