पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST2021-05-23T04:18:46+5:302021-05-23T04:18:46+5:30
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम नसल्याने आर्थिक समस्या ...

पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणी
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम नसल्याने आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ही दरवाढ करण्यात आल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे दरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार संदीप कुलकर्णी यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती मन्मथ किडे, मारुती पांडे, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबिडे, शीलाताई पाटील, बाबुराव जाधव, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, संग्राम कांबळे, सिध्दार्थ सूर्यवंशी, संग्राम नामवाड, सरपंच शिरीष चव्हाण, प्रशांत देवशेट्टे, रियाज सय्यद, लक्ष्मण तगडमपल्ले, सुधाकर सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. निवेदनावर अनिल सोनकांबळे, शंकर धुळशेट्टे, मुसा सय्यद, अंकुश करडे, राजेंद्र वाघमारे, अमोल गायकवाड, माधव कवठाळे, इस्माईल सय्यद, नसरोद्दीन शेख, केरबा सावकार, तय्यब शेख, हरिभाऊ राठोड, बिलाल पटेल, उस्मान पटेल, बालाजी मुंडे यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.