चिंचोलीतील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:29+5:302021-07-02T04:14:29+5:30
यावेळी उपसरपंच विश्वास कावळे, ग्रामसेवक हनुमंते, मधुकर जोगदंड, गोविंद नांदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राजकुमार ...

चिंचोलीतील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी
यावेळी उपसरपंच विश्वास कावळे, ग्रामसेवक हनुमंते, मधुकर जोगदंड, गोविंद नांदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राजकुमार सुरवसे, शिवसेना विधानसभा संघटक कैलास पाटील, उमाकांत कुमठेकर, अत्तार, महादेव भालेकर, मधुकर चौधरी, शरद घनगावकर, लक्ष्मण भडंगे, आदी उपस्थित होते.
चिंचोली ब. येथे पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही समस्या दूर करावी तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी. नाल्यांची सफाई करावी. कृती आराखड्यानुसार निधी योग्य त्या ठिकाणी खर्च करावा. स्मशानभूमीमध्ये पाण्याची सोय करावी. कोविडची तिसरी लाट येण्यापूर्वी शासनाने सुचविल्याप्रमाणे विविध उपाययोजना गावस्तरावर राबवाव्यात. दोन्ही बस स्थानक व गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी. गावातील बंद पथदिवे सुरू करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
010721\20210630_114514.jpg
विविध मागण्यांबाबत निवेदन