बेकायदा दारूच्या विक्री प्रकरणी कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:29+5:302021-06-09T04:24:29+5:30
जागतिक पर्यावरण दिन साजरा लातूर : भारत दूरसंचार निगम कार्यालयाच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यालय परिसरात यावेळी ...

बेकायदा दारूच्या विक्री प्रकरणी कारवाईची मागणी
जागतिक पर्यावरण दिन साजरा
लातूर : भारत दूरसंचार निगम कार्यालयाच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यालय परिसरात यावेळी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. दूरसंचारचे जिल्हा प्रबंधक अनिल बनसोडे यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राजू आकनगिरे, विजयकुमार पाटील, सुरेश स्वामी, संगीता देशमाने, ए.आर. अंतुरे, पी.टी. कांबळे, एम.के. तोंडारे, राजेश पांडे आदींची उपस्थिती होती.
आशाताई भिसे यांची पक्षनिरीक्षकपदी नियुक्ती
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आशाताई भिसे यांची नांदेड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली असून, नियुक्तीचे पत्र आशाताई भिसे यांना नुकतेच देण्यात आले आहे.
पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना रोजगार
लातूर : पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनच्या विविध कंपन्यांच्या टेक्निकल स्क्रिनिंग टेस्टद्वारे (मुलाखतीतून) २१८ विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कोरोना काळात महाविद्यालयाने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले. डॉ. आर.के. कदम, प्रा. डी.ए. शेटे यांनी ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेतले. डॉ. के.एम. बकवाड, उपप्राचार्य व्ही.डी. नितनवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे डॉ. अभय वाघ, महेश शिवणकर यांनी कौतुक केले.
आरोग्य केंद्रास गॅसचे वाटप
लातूर : प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत विळेगाव, कोपरा, चिखली, हिंगणगाव या चार आरोग्य उपकेंद्रांना भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रा. रेखाताई हाके यांच्या हस्ते गॅसचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य त्रिंबक घुटे, प्राचार्य शोभाताई टोम्पे, हेमंत घुटे, चंद्रप्रकाश हंगे, रतन सौदागर, आरिफ देशमुख, सुरेश आंधळे, धनंजय चाटे, डॉ. प्रमोद सांगवीकर, जिलानी शेख, आरोग्य सहायक नरहरी, फड आदींची उपस्थिती होती.
तांदुळजा येथे वृक्षारोपण मोहीम
लातूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे वृक्षारोपण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात झालेल्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सरपंच वनिताताई बावणे, जि.प. सदस्य मनीषा वाघमारे, उपसरपंच अंकुश गणगे, श्यामसुंदर वाघमारे, शिवाजीराव बावणे, श्रीमंत साळवे, अमोल गुळभिले, सचिन कांबळे, जनक गायकवाड, सपोनि. ढवळे, डॉ. लुगडे आदींसह कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होते.
‘किलबिल’च्या वतीने घरोघरी वृक्षारोपण
लातूर : किलबिल नॅशनल स्कूलच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला. दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घरोघरी वृक्ष लागवड करण्यासंदर्भात प्रोत्साहन देण्यात आले. शेतात, घरी झाड लावताना त्याची सेल्फी काढून शाळेकडे पाठविण्यात आल्या. या उपक्रमाला पालक वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरसेवक कमलाबाई आगलावे, शेख जिलानी, बाळासाहेब आगलावे, शाहेद सौदागर, रफियोद्दीन मुंजेवार, शेख शहाबुद्दीन, शेख अस्लम, मुहम्मद रियाज, शेख खय्युम आदींची उपस्थिती होती.
वाढीव दराने खतविक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी
लातूर : वाढीव दराने खताची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निलंगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषी विभागाकडे करण्यात आली आहे. महाबीज बियाणांमध्ये एक ते दीड हजार रुपयांची तफावत आढळून येत आहे. मागणी व पुरवठ्यात तफावत आहे. याबाबतची चौकशी करावी, वाढीव दराने खत व बियाणांची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, असे कृषी विभागाला दिलेल्या निवेदनात सुधीर महालिंगे, संदीप मोरे, अंगद जाधव, ग्राहक सेलचे गफार लालटेकडे, बालाजी जोडपल्ले, धम्मानंद कांबळे, अनंत पवार आदींनी केले.
कलावंतांना मदत करण्याची मागणी
लातूर : लॉकडाऊन काळामध्ये मोलमजुरी तसेच कलावंतांची गैरसोय झाली. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन काळात उपासमार झालेल्या कलावंतांना शासनाने मदत करावी. अंध, अपंग, विधवा यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जळकोट तहसीलदारांकडे करण्यात आली. निवेदनावर देविदास कांबळे, विनोद कांबळे, कोंडिबा सवारे, सुरेश गायकवाड, बाबासाहेब कांबळे, अनिल काळे, अण्णाराव कांबळे, विकास राठोड, संजय गायकवाड, बजरंग वाघमारे, अनिल गायकवाड, राहुल गायकवाड, तिरुपती सूर्यवंशी, पंकज गायकवाड, मिलिंद कोकणे, माधव वाघमारे, देविदास आडे, दिनेश आडे, संतोष गायकवाड, प्रदीप कांबळे, सुधीर इराळे आदींची नावे आहेत.