दीपक कोनाळे यांनी वजीर सुळक्यावर फडकविला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:22+5:302020-12-30T04:26:22+5:30

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील शिंदीकामठ येथील दीपक कोनाळे यांनी यापूर्वी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो मांजरारो आणि युरोप ...

Deepak Konale hoisted the tricolor on Wazir Sulakya | दीपक कोनाळे यांनी वजीर सुळक्यावर फडकविला तिरंगा

दीपक कोनाळे यांनी वजीर सुळक्यावर फडकविला तिरंगा

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील शिंदीकामठ येथील दीपक कोनाळे यांनी यापूर्वी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो मांजरारो आणि युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रस सर करून आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये, रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या माहुली किल्ला परिसरात असलेला वजीर सुळका सर करत तेथे तिरंगा फडकविला आहे.

सदर वजीर सुळका हा उंचउंच टेकड्या, घनदाट जंगल अणि त्या मधोमध असलेला ९० अंशतील हा सरळ सुळका आहे. कोणाच्याही अंगावर शहारे येतील असा हा सुळका आहे. ही जागा पाहूनच सामान्यच्या काळजाचा ठोका चुकतो. तिथे या वजीर सुळकेची चढाई करणे याची कल्पना ही अशक्य आहे. मात्र ते धाडस लातूरच्या आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक दिपक कोनाळे यांनी वजीर सुळका सर करून नवा विक्रम केले आहे.

निसरडी गवताळ पाउलवाट ९० अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई, सुळकेच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास ६०० फूट अणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे या सुळक्यावर ट्रेकिंग करायचे ठरवले अणि इकडचा पाय तिकडे पडला तर थेट दरीच्या जबड्यात गिर्याराेहक पडताे. मात्र नाशिक येथील पॉईंट ब्रेक अडव्हेंचर टीमच्या मदतीने दीपकने अशक्य ते शक्य करून दाखवले आहे.

२०१८ मध्ये केला विश्वविक्रम...

दिपक कोनाळे यांनी जुलै २०१८ मध्ये आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमंजारो, युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रुस सर करून भारतातील सर्वात मोठा तिरंगा फडकावत, राष्ट्रगीत गात विश्व विक्रम केला आहे. याची इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड, हाय रेंज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

Web Title: Deepak Konale hoisted the tricolor on Wazir Sulakya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.