ग्रामीण रुग्णालयास व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:24+5:302021-07-20T04:15:24+5:30

अध्यक्षस्थानी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. अशोक आरदवाड, स्पंदन ऑक्सिजन ...

Dedication of ventilator, oxygen concentrator to rural hospital | ग्रामीण रुग्णालयास व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण

ग्रामीण रुग्णालयास व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण

अध्यक्षस्थानी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. अशोक आरदवाड, स्पंदन ऑक्सिजन प्लांटचे संजय अयाचित, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, प्रशांत भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अझर बागवान, दयानंद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, गोपीनाथराव जोंधळे, बाजार समितीचे संचालक श्याम देवकते, आशिष तोगरे, शेख फेरोज, व्यंकट मुंडे, गोपीनाथ जायभाये, शंकर आगलावे उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश सूर्यवंशी यांनी केले. आभार अनिकेत काशीकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. सूरजमल सिंहाते, डॉ. धीरज देशमुख, डॉ. अमृत चिवडे, डॉ. तुषार पवार, डॉ. नाथराव कराड यांनी परिश्रम घेतले.

लवकरच ऑक्सिजन प्लांट...

आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, येथे ऑक्सिजन प्लांट लवकरच सुरू होणार आहे, तसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू होणार आहे. तालुक्यातील खंडाळी व रोकडा सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित होणार असून, त्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला आहे. अविनाश व हेमा राचमाले यांनी अमेरिकेहून जिल्ह्यासाठी ९ व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले असून, त्यातील एक अहमदपूर ग्रामीण रुग्णालयासाठी आहे.

Web Title: Dedication of ventilator, oxygen concentrator to rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.