रेणापूर शहरात सहा नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:37+5:302021-08-24T04:24:37+5:30

रेणापूर : येथील नगर पंचायत हे मोठ्या लोकवस्तीचे ठिकाण असून, कचरा संकलनासाठी आधुनिक घंटागाडीची आवश्यकता भासत होती. हीच ...

Dedication of six new bell trains in Renapur city | रेणापूर शहरात सहा नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण

रेणापूर शहरात सहा नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण

रेणापूर : येथील नगर पंचायत हे मोठ्या लोकवस्तीचे ठिकाण असून, कचरा संकलनासाठी आधुनिक घंटागाडीची आवश्यकता भासत होती. हीच गरज ओळखून नगराध्यक्ष आरती राठोड, उपनगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून ३६ लाखांचा निधी उपलब्ध केला. यातून सहा घंटागाड्या घेण्यात आल्या असून, सोमवारी त्यांचे लोकार्पण करण्यात आले.

नगराध्यक्ष आरती राठोड यांच्या हस्ते या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले असून, उपनगराध्यक्ष आकनगिरे यावेळी उपस्थित होते. यावेळी नगर पंचायतीचे बांधकाम सभापती दत्ता सरवदे, पाणी पुरवठा सभापती उज्ज्वल कांबळे, नगरसेवक एकनाथ अकनगिरे, जमुनाबाई राठोड, रजियाबी शेख, श्रीकृष्ण मोटेगावकर, अंतराम चव्हाण, अजिम शेख, व्यापारी अध्यक्ष रमाकांत वाघमारे, राजकुमार आलापुरे, धनंजय म्हेत्रे, पाशाभाई शेख, हणमंत भालेराव, मारूफ आत्तार, महेश गाडे, गोविंद राजे, रेणुकादेवी मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम पाटील, सचिव उटगे गुरुजी, दिलीप अकनगिरे, लखन आवळे, योगेश राठोड, रमेश चव्हाण, दिलीप चव्हाण, टिंकू दळवी, रफिक शिकलकर, जयदीप बोडके, परमेश्वर मोटेगावकर, लक्ष्मण मारकड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. दरम्यान, लोकार्पण झाल्यावर उपनगराध्यक्ष आकनगिरे यांनी स्वत: घंटागाडी संपूर्ण शहरात फिरवली.

Web Title: Dedication of six new bell trains in Renapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.