शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

लातूर बाजार समितीत नव्या तुरीची आवक वाढल्याने दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 18:58 IST

बाजारगप्पा : चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे; परंतु सुरुवातीसच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

- हरी मोकाशे ( लातूर )

शेतकऱ्यांनी तुरीची काढणी करून राशी करण्यास सुरुवात केल्याने लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज नव्या तुरीची जवळपास २५० क्विंटल आवक होण्यास सुरुवात झाली आहे; परंतु बाजारपेठेत मिळणारा दर हा हमीभावापेक्षा कमी असून, तो ४५६० रुपये प्रति क्विंटल आहे़ परिणामी, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे १ हजार ४० रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.

खरिपातील तूर काढणी व राशीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे़ यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे तुरीच्या शेंगांमध्ये अपेक्षित बी भरणा झाला नाही़ बहुतांश शेतकऱ्यांच्या तुरीचा तर खराटाच झाला़ जे शेतकरी राशी करीत आहेत, त्यांच्या तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ दरम्यान, शासनाने तुरीस ५ हजार ६०० रुपये आधारभूत किंमत जाहीर केल्याने आणि गत महिन्यात तूर डाळीच्या दरात वाढ झाल्याने यंदा तुरीला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे; परंतु सुरुवातीसच शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीन या शेतमालाची आवक घटल्याने बाजार समितीतील आर्थिक उलाढाल कमी झाली आहे़ गत आठवड्यापासून सोयाबीनला मिळणारा दर कमी झाला आहे़ सध्या सर्वसाधारण दर ३२८० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे़ बाजारपेठेत दररोज सोयाबीनची आवक १७ हजार १२५ क्विंटल होत असून ती स्थिर आहे; परंतु कमाल दरही घसरला असून, तो ३ हजार ३५८ रुपये असा आहे़ नव्या तुरीमुळे आवक वाढली असून ती ४ हजार ७७ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे़ कमाल दर ४८५० रुपये, सर्वसाधारण दर ४५६०, तर किमान भाव ४३०१ रुपये मिळत आहे. 

बाजारपेठेत मुगाची आवक घटली असून २६५ क्विंटल होत आहे़ सर्वसाधारण दर ५२०० रुपये मिळत असून, गत आठवड्याच्या तुलेनत सध्या दरात शंभर रुपयांनी वाढ झाली आहे़ गतवर्षीच्या रबीतील हरभऱ्याची आवक ९७३ क्विंटल होत आहे़  हरभऱ्याच्या दरात शंभर रुपयांनी घट झाली असून, सर्वसाधारण दर ४ हजार ५० रुपयांवर पोहोचला आहे़ बाजरीस सर्वसाधारण दर १९००, गहू- २४००, हायब्रीड ज्वारी- १३५०, रबी ज्वारी- २४५०, पिवळी ज्वारी- ४३००, मका- १६००, उडीद- ४५००, करडई- ४२००, सोयाबीन- ३२८०, तीळ- १२०००, गूळ- २५१५, धने- ४३०० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळत आहे़ हिरवा चारा व कडब्याच्या दरात वाढ झाली असून, ४५ रुपयांना एक पेंढी अशा दराने विक्री होत आहे़

वास्तविक पाहता, तुरीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शासनाने नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे ठरत असतानाही अद्यापही हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत़ हे केंद्र चालविण्यासाठी खाजगी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यातच प्रशासन मश्गुल असल्याचे दिसून येत आहे़ यंदा उडीद, मूग खरेदीसाठीही वेळेवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करीत आपला शेतमाल खुल्या बाजारपेठेत मिळेल त्या दराने विक्री करावा लागला.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी