निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST2021-07-01T04:15:12+5:302021-07-01T04:15:12+5:30
वलांडी : देवणी तालुक्यातील अचवला येथील माजी सरपंच तुळशीराम दौलतराव कारभारी (७२) यांचे बुधवारी पहाटे अल्पश: आजाराने निधन झाले. ...

निधन वार्ता
वलांडी : देवणी तालुक्यातील अचवला येथील माजी सरपंच तुळशीराम दौलतराव कारभारी (७२) यांचे बुधवारी पहाटे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सुभद्राबाई शिंदे
उदगीर : येथील सुभद्राबाई लिंबाजीराव शिंदे (८०) यांचे बुधवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
उत्तम कलकाेटे
लातूर : उदगीर येथील सेवानिवृत्त शिक्षक उत्तम निवृत्तीराव कलकाेटे (८०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उदगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, दाेन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डाॅ़ एकनाथ कलकाेटे, ओमप्रकाश कलकाेटे यांचे ते वडील हाेत.
चंद्रकला मद्रेवार
लातूर : शहरातील औसा राेड येथील चंद्रकला किशनराव मद्रेवार (८०) यांचे अलश: आजाराने मंगळवारी ११ वाजता निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पती, मुले, सूना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे़ उमाकांत मद्रेवार यांच्या त्या आजी हाेत़
माेहन बनसाेडे
लातूर : औसा तालुक्यातील माताेळा येथील रहिवासी माेहन हणमंतराव बनसाडे (४२) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर मूळगावी माताेळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ ते समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर येथे निरीक्षक म्हणून कार्यरत हाेते़