विजेचा धक्का लागून रोजंदारी कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST2021-05-24T04:18:50+5:302021-05-24T04:18:50+5:30
अनिल पंढरी गायकवाड (२४, रा. लांजी, ता. अहमदपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. अहमदपूर तालुक्यातील लांजी येथील अनिल गायकवाड ...

विजेचा धक्का लागून रोजंदारी कर्मचाऱ्याचा मृत्यू
अनिल पंढरी गायकवाड (२४, रा. लांजी, ता. अहमदपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. अहमदपूर तालुक्यातील लांजी येथील अनिल गायकवाड हा महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत रोजंदारीने काम करीत असे. शनिवारी दुपारी लांजी, तांबट सांगवी ११ केव्ही लाईनवर फॉल्ट असल्याचे समजताच महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने तो विद्युत खांबावर चढला होता; मात्र त्याठिकाणी क्रॉसिंग आहे की नाही, हे लक्षात न आल्याने त्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळून जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर नातेवाइकांनी त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. जोपर्यंत संबंधित महावितरणच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन न करण्याचा पवित्रा घेतला.
अखेर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांच्या आक्रमकतेमुळे मयताचे मामा भालेराव निवृत्ती यांच्या फिर्यादीवरून वरिष्ठ तंत्रज्ञ सत्यभामा जाधव, ऑपरेटर शाम गंगथडे, अभियंता गणेश कांबळे यांच्याविरुद्ध कलम ३०४ व ३४ भादंविनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव करीत आहेत.