शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, रुग्णवाहिका बनल्या शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:17 AM

औसा तालुक्यातील किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात दोन रूग्णवाहिका उभ्या असूनसुद्धा केवळ चालक नसल्याने अपघातातील एका गंभीर जखमी रुग्णास खासगी वाहनाने लातूरला घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्णवाहिका उभ्या असूनसुद्धा केवळ चालक नसल्याने अपघातातील एका गंभीर जखमी रुग्णास खासगी वाहनाने लातूरला घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. किल्लारीजवळील पेट्रोलपंपानजीक दोन दुचाकीचा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला होता. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.गंभीर जखमी झालेल्या अभिषेक अनिल कोहाळे याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला रेफर करण्यात आले होते. या ठिकाणी १०८ व १०२ अशा दोन रूग्णवाहिका असतानाही चालक नसल्याने खासगी वाहनाने लातूरला हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. किल्लारी येथील उमरगा रोडवरील एका पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकीचा अपघात झाला. दुचाकी एमएच २४ एके ८३९ वर गुलाब व्यंकट पवार व अभिषेक अनिल कोहाळे हे किल्लारीपाटी जात होते. तर एमएच १३ एआर ४८२३ वर महादेव गिरी, महानंदा गिरी दोघे जण मुदगड एकोजीकडे जात असताना सुधीर बिराजदार यांच्या शेतानजीक अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक अनिल कोव्हाळे यांना ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला रेफर करण्यात आले. मात्र, वाटेत मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे.चालक नसल्याने गैरसोयवैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील म्हणाल्या, कायमस्वरूपी चालक नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. प्रकाश शेलार म्हणाले, तांत्रिक अडचणीमुळे रुग्णवाहिका बंद आहे. डॉक्टर कमी असल्याने अडचण आहे. डॉक्टरची रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात