लातूरकरांना दुपारी ४ वाजेपर्यंतची डेडलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:19+5:302021-06-27T04:14:19+5:30
लातूर : तिसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून, लातूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी ४ ...

लातूरकरांना दुपारी ४ वाजेपर्यंतची डेडलाईन
लातूर : तिसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून, लातूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक गटात नसलेली दुकाने शनिवार व रविवार अशी दोन दिवस बंद राहणार आहेत. याशिवाय मॉल, चित्रपटगृहे, सुपर शॉप बंद असतील. हॉटेल, रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील, त्यानंतर पार्सल सेवा, लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे, कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरूच राहणार असून, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकीच्या अनुषंगाने १०० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शंभर टक्के सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी शनिवारी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.