उदगीरात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

By हरी मोकाशे | Updated: August 11, 2022 16:21 IST2022-08-11T16:20:31+5:302022-08-11T16:21:16+5:30

उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नई आबादी परिसरातील निडेबन गावच्या तलाठी कार्यालयासमोर आढळले अर्भक

dead infant of male species found in Udgir; Crime against unknown | उदगीरात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

उदगीरात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

उदगीर (जि. लातूर) : येथील नई आबादी भागातील निडेबन तलाठी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नवजात पुरुष जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळले. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली. ही माहिती कळल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

उदगीर शहर पोलिसांनी सांगितले की, उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नई आबादी परिसरातील निडेबन गावच्या तलाठी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान एक पुरुष जातीचे नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळले. या भागात कार्यालयाकडे जात असलेले व्यापारी बाळासाहेब पाटोदे यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी शहर पोलिसांना कळवले. सदरील वृत्त समजताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे हे स्वतः कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून सदरील मृत नवजात अर्भक ताब्यात घेतले. याबाबत बाळासाहेब पाटोदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी दुपारी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध उदगीरच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: dead infant of male species found in Udgir; Crime against unknown