सय्यदपूर येथील वनक्षेत्रात आगीमुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:24 IST2021-02-17T04:24:52+5:302021-02-17T04:24:52+5:30
महाराष्ट्र शासन वनविभाग उस्मानाबाद वन परिक्षेत्र सय्यदपूर ता.देवणी येथे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली असता सय्यदपूर येथील ...

सय्यदपूर येथील वनक्षेत्रात आगीमुळे नुकसान
महाराष्ट्र शासन वनविभाग उस्मानाबाद वन परिक्षेत्र सय्यदपूर ता.देवणी येथे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली असता सय्यदपूर येथील वृक्षप्रेमीनी देवणी तहसीलदार याना संपर्क साधून झालेली घटना सांगताच तहसीलदार सुरेश घोळवे यानी उदगीर आणि निलंगा येथीर अग्निशमन दलाला पाचारण केले. गावाच्या बाजूने आग नियंत्रणात आणली आहे.यामुळे कोणत्याही घराला आग लागली नसल्याने जीवित व आर्थिक हानी झाली नाही.या आगीत १० ते १५ उकिरडे व सरपण जळून गेले आसल्याची माहिती तहसिलदारांनी दिली.
आगीत वनविभागाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमातील हजारो झाडे जळून खाक झाली आहेत.ही आग नियंत्रणात आणण्यासाठी स्वतः तहसीलदार जातीने घटनास्थळी हजर होते. सोबत नायब तहसीलदार हीसामोदीन शेख, वनविभागाचे अधिकारी तेलंगे, डिगोळे यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी व सय्यदपूरसह परीसरातील नागरीक व अग्नीशमन दलानी परिश्रम घेतले.