किल्लारीच्या नीळकंठेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:31+5:302021-08-24T04:24:31+5:30

कोरामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे मंदिरातील सर्व विधी पार पडणार आहेत. सोमवारी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने ...

A crowd of devotees at the Neelkantheshwar temple in Killari | किल्लारीच्या नीळकंठेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

किल्लारीच्या नीळकंठेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

कोरामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे मंदिरातील सर्व विधी पार पडणार आहेत. सोमवारी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन परतावे लागले. श्री नीळकंठेश्वराची यात्रा पंचक्रोशीत प्रसिध्द असून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यासह कर्नाटकच्या सीमावर्ती गावातून भाविक येतात. २३ ऑगस्टपासून सुरू होणारी ११ दिवसांची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात होणारे अभिषेक मंदिराच्या बाहेर असलेल्या शिवलिंगावर होत असून यासाठी भाविकांच्या रांगा आहेत. जोपर्यंत शासनाचे आदेश येणार नाहीत, तोपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार नसल्याचे कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. यात्रा काळात दररोज होणारा पूजाविधी सुधाकरराव कुलकर्णी करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कमिटीचे उपाध्यक्ष अशोक गावकरे, सुभाष लोहार, मनोहर गवारे, चंद्रकांत बाबळसुरे, प्रकाश पाटील, नामदेव माळवदे, नीळकंठ बिराजदार तसेच यात्राकाळात परिश्रम घेणारे राजेंद्र जळकोटे, बिसरसिंग ठाकूर, प्रशांत गावकरे, देवस्थान व्यवस्थापक अनिल बाबळसुरे उपस्थित होते. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सपोनि. सुनील गायकवाड, गौतम भोळे, आबा इंगळे यावेळी उपस्थित होते.

Web Title: A crowd of devotees at the Neelkantheshwar temple in Killari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.