लामजन्यात बहरले तुरीचे पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST2020-12-14T04:33:05+5:302020-12-14T04:33:05+5:30
लामजना येथील शेकनूर मिर्झा पटेल यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रा. नंदकुमार कुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली फुले राजेश्वरी जातीच्या एक किलो ...

लामजन्यात बहरले तुरीचे पीक
लामजना येथील शेकनूर मिर्झा पटेल यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रा. नंदकुमार कुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली फुले राजेश्वरी जातीच्या एक किलो बियाणाची ३० गुंठे क्षेत्रावर जूनमध्ये पेरणी केली होती. दरम्यान, त्यांनी चार वेळा फवारणी केली, तसेच वेळोवेळी मशागत केली. त्यामुळे तुरीच्या रोपांची उंची जवळपास ६ ते ७ फूट असून, शेंगा लगडल्या आहेत.
त्यांच्या शेतीची येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष नजीर पटेल, सय्यद लाडखाॅ, महेबूब बिरादार, समशेर शेख, ताजोद्दीन मुल्ला, मोहन कुनाळे, विनायक सागावे, मोसीन बिरादार, बालाजी शिंदे, तानाजी होळेकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी पाहणी केली. दरम्यान, त्यांच्या तुरीची परिसरात चर्चा असून शेतकरी पाहणीसाठी येत आहेत.
शेतकरी शेकनूर मिर्झा पटेल म्हणाले, तुरीच्या पिकाची लागवड करण्यापूर्वी चांगली मशागत करून पेरणी केली, तसेच तुरीच्या पिकात योग्य अंतर ठेवून फवारणी केली. पीक बहरले आहे. चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
----------------------------------------------