सक्षमीकरण अभियानांतर्गत ११३५ बचत गटांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:05+5:302021-06-05T04:15:05+5:30
लातूर : ग्राम विकास व जलसंधारण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लातूरच्यावतीने महिला ...

सक्षमीकरण अभियानांतर्गत ११३५ बचत गटांची निर्मिती
लातूर : ग्राम विकास व जलसंधारण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लातूरच्यावतीने महिला महासमृद्धी सक्षमीकरण अभियान दि. ८ मार्च ते ५ जून या कालावधीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शासनाने अधोरेखित केलेले विविध उपक्रम राबविण्यात आले.
त्यामध्ये १ हजार १३५ बचत गटांची निर्मिती, ७७ ग्रामसंघ, ६ प्रभाग संघ, ३५ महिला उत्पादक गटांची निर्मिती करण्यात आली. तसेच ६९२ समूहांना १२ कोटी ३४ लाख रुपये बँक कर्ज वितरीत करण्यात आले. १० भाजीपाला विक्री केंद्र, २३ कॅन्टीन, १ व्यायामशाळा व ६० हजार मास्कची निर्मिती करून ९ लाख ९५ हजार रुपयांच्या मास्कची विक्री केली आहे. या अनुषंगाने घर सांभाळण्यापासून ते घर बांधण्याच्या साहित्याचे घरकुल मार्ट सुरू करण्याचा संकल्प केला. या २० घरकुल मार्टचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी हेमंत वसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, प्रकल्प संचालक संतोष जोशी, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे उपस्थित होते. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक वैभव गुराळे, अनिता माने, लेखाधिकारी अंबिकर, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.