शेळगाव येथे कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:26+5:302021-05-14T04:19:26+5:30

यावेळी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, पंचायत समिती उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील, पंचायत ...

Covid vaccination at Shelgaon | शेळगाव येथे कोविड लसीकरण

शेळगाव येथे कोविड लसीकरण

यावेळी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, पंचायत समिती उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील, पंचायत समिती सदस्य वसंतराव डिगोळे, जिल्हा परिषद सदस्य विमल पाटील, सरपंच महानंदा चापुले, वैद्यकीय अधिकारी डी.के. सावंत, डॉ. प्रिया जक्कलवाड, डॉ. सुप्रिया मुंडे आदी उपस्थित होते.

सरपंच चापुले यांनी पालकमंत्र्यांकडे शेळगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी ती मागणी पूर्ण केली. यावेळी २०० जणांना लस देण्यात आली. यावेळी परिचारिका जयश्री जाधव, एस.आर. गायकवाड, एस.एस. भालके, एस.पी. बोनते, ए.एस. पाखेडे यांचा परिचारिका दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जी.बी. पवार, विक्रम मुंढे, टी.व्ही. कोळीकर, बी.व्ही. सुवर्णकार, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल घुगे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Covid vaccination at Shelgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.