जळकोटच्या नगरपंचायतीस नगरसेवकांनीच ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 17:20 IST2018-12-28T17:16:44+5:302018-12-28T17:20:17+5:30
माहिती देण्यास मुख्याधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप

जळकोटच्या नगरपंचायतीस नगरसेवकांनीच ठोकले टाळे
जळकोट (जि़ लातूर) : जळकोट नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी शहरातील विविध विकास कामांची माहिती देण्यास दिरंगाई करीत आहेत, असा आरोप करीत शुक्रवारी येथील आठ नगरसेवकांनी नगरंचायतीस टाळे ठोकले़
जळकोट नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना ५ व १९ डिसेंबर रोजी लेखी निवेदन देऊन शहरातील विविध विकास कामांची माहिती मागविली़ परंतु, ही माहिती देण्यास मुख्याधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत आहे़ त्यामुळे संताप व्यक्त करीत नगरसेवकांनी नगरपंचायतीस टाळे ठोकले़ यावेळी नगरसेवक शिवानंद देशमुख, महेश धुळशेट्टे, डॉ. शितल काळे, रमाकांत रायेवार, गंगाबाई डांगे, संगिता मठदेवरु, डॉ. चंद्रकांत काळे, सुशिलाबाई डांगे आदी नगरसेवक उपस्थित होते.