शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जलपुनर्भरणासाठी मनपा सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST

लातूर : महानगरपालिका आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने शहरात कॅच द रेन अभियान राबविण्यात येत असून, छतावरील ...

लातूर : महानगरपालिका आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने शहरात कॅच द रेन अभियान राबविण्यात येत असून, छतावरील पाण्याचे संकलन आणि पुनर्भरण केले जाणार आहे. यासाठीच्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी दहा सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. लातूर शहरामध्ये २०१५-१६मध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. रेल्वेने पाणी आणण्याची नामुष्की लातूर शहरावर ओढवली होती. लातूर शहर हे अवर्षण भागात असल्यामुळे दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, यासाठी छतावर पडणारे पावसाचे पाणी संकलित करून पुनर्भरण करण्याचा कार्यक्रम मनपाने हाती घेतला आहे. शहरातील इमारतींवरील पावसाचा प्रत्येक थेंब भूजलात रुपांतर करण्याकरिता संकलन करून बोअर, शोष खड्ड्यांमध्ये पुनर्भरण केले जाणार आहे. हे अभियान १ जुलैपासून राबविले जाणार आहे. पुनर्भरण हे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी १० संस्थांची तांत्रिक मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणाही मदतीला आहे. पुनर्भरण कार्यक्रम अत्यंत कमी खर्चाचा असून, छताच्या प्रमाणकाचा विचार केल्यास १५ ते २० रुपये प्रति चौरस फूट एवढा खर्च येतो. त्यासाठी महानगरपालिकेने जनजागृती सुरू केली आहे.

शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ज्या दुमजली इमारती आहेत, सोसायटी आहेत, त्या सर्व इमारती, सोसायटीच्या छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्भरण करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसची पोहोच संबंधित मालमत्ताधारकांकडून घेतली असून, सोसायटीचे नाव, अध्यक्ष, सचिवाचे नाव, दूरध्वनी क्रमांक याबाबतचा सर्व अहवाल संकलित करण्याचे काम सुरू आहे. २८ जूनपर्यंत अहवाल आल्यानंतर १ जुलैपासून प्रत्यक्ष पुनर्भरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी दिली.

मालमत्ता करात ५ टक्के सूट

ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या छतावरचे पाणी संकलित करून पुनर्भरण केले आहे, त्या मालमत्ताधारकांना मालमत्ता करात ५ टक्के सूट दिली जाणार आहे. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. - अमन मित्तल, मनपा आयुक्त

तर बांधकाम परवाना रद्द

छतावरील पाण्याचे भूजल पुनर्भरण करून सचित्र अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. पुनर्भरण न केल्यास संबंधित इमारतीचा बांधकाम परवाना रद्द करण्यात येणार आहे. शिवाय, दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. हे अभियान १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगानेही मनपा आयुक्तांनी सूचना केल्या आहेत.