भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मनपाकडे यंत्रणाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST2021-01-21T04:18:23+5:302021-01-21T04:18:23+5:30
आरोग्य विभागाकडे पशुसंवर्धनाचे काम... मनपाच्या आरोग्य विभागाकडेच पशुसंवर्धनचे काम साेपविले आहे. या विभागाकडून पशुसंवर्धन अधिकारी यांची गरज असल्याचा प्रस्ताव ...

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मनपाकडे यंत्रणाच नाही
आरोग्य विभागाकडे पशुसंवर्धनाचे काम...
मनपाच्या आरोग्य विभागाकडेच पशुसंवर्धनचे काम साेपविले आहे. या विभागाकडून पशुसंवर्धन अधिकारी यांची गरज असल्याचा प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे दाेन महिन्यांपूर्वी पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आराेग्य विभागातील कर्मचा-यांना पशुसंवर्धनचे अतिरिक्त काम करावे लागते.
शहरात चार ठिकाणी ॲण्टीरेबीज व्हॅक्सिन केंद्र...
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्यावर लस घेण्यासाठी शहरात चार ठिकाणी ॲण्टीरेबीज व्हॅक्सिन सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. राजीवनगर, इंदिरानगर, गौतमनगर आणि पटेल चौकातील नागरी दवाखान्यांमध्ये हे सेंटर सुरू होणार आहेत. - डॉ. महेश पाटील, आराेग्य विभाग
या भागात कुत्र्यांचा सुळसुळाट...
शहरातील प्रकाशनगर भागातील मुख्य रस्ता, समांतर रोड, पाच नंबर चौक, विठ्ठलनगर, खाडगाव रोड, अवंतीनगर, विक्रमनगर, मित्रनगर, औसा रोड, संभाजीनगर, उद्योग भवन परिसर, कोकाटेनगर, बोधेनगर, क्रांतीनगर, पटेलनगर, माताजीनगर, गांधीनगर, बार्शी रोड भाजी मंडई परिसर आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीचा पाठलाग करण्यात आल्याच्या घटना या भागात होतात. कुत्र्यांमुळे अनेकांचे अपघात घडले आहेत.