CoronaVirus : उदगीरला धक्का ! कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कातील चौघे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 18:53 IST2020-04-29T18:51:49+5:302020-04-29T18:53:34+5:30

उदगीरमधून घेतलेल्या १०५ स्वॅबपैकी मयत महिलेच्या संपर्कातील ९८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

CoronaVirus: shock to Udgir! Four positives in contact with a corona positive dead woman | CoronaVirus : उदगीरला धक्का ! कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कातील चौघे पॉझिटिव्ह

CoronaVirus : उदगीरला धक्का ! कोरोनाबाधित मृत महिलेच्या संपर्कातील चौघे पॉझिटिव्ह

ठळक मुद्देआजपर्यंत मयत महिलेसह उदगीरमध्ये एकूण ८ जणांना लागण झाली आहे.

लातूर : कोरोनाबाधित वयोवृद्ध मयत महिलेच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले असून, उदगीरच्या सामान्य रुग्णालयात आता एकूण ७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत मयत महिलेसह उदगीरमध्ये एकूण ८ जणांना लागण झाली आहे. त्याचवेळी एकट्या उदगीरमधून घेतलेल्या १०५ स्वॅबपैकी मयत महिलेच्या संपर्कातील ९८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

बुधवारी १६ स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील १५ निगेटिव्ह व एक पॉझिटिव्ह आला, तर २८ एप्रिल रोजी तपासणी झालेले व प्रलंबित राहिलेले तीन अहवालही आले असून, ते पॉझिटिव्ह आहेत. या संदर्भात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर म्हणाले, आतापर्यंत बाधित वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर उदगीरमधून आलेले एकूण १०५ स्वॅब तपासले आहेत. पहिल्या टप्प्यात २६ स्वॅब घेतले होते. त्यातील २१ निगेटिव्ह आले. ३ पॉझिटिव्ह आले. तर दोन स्वॅब पुनर्तपासणीला पाठविले. तसेच वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांचे ३० स्वॅब तपासले, तेही सर्व निगेटिव्ह आले. तद्नंतर दुसºया टप्प्यात महिलेच्या संपर्कातील कुटुंबीय व इतरांचे ३५ स्वॅब घेण्यात आले. त्यातीलही ३२ अहवाल निगेटिव्ह आले, तर तीन प्रलंबित होते. सदर प्रलंबित असलेले तिन्ही अहवाल बुधवारी प्राप्त झाले असून, ते पॉझिटिव्ह आहेत. तसेच पुनर्तपासणी केलेल्यांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह आहे. 

उदगीरच्या सामान्य रुग्णालयात एकूण ७ बाधितांवर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील एकूण ३७२ स्वॅबची तपासणी करण्यात आल्याची माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. आजाराची लक्षणे असणाºयांनी व बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे.

Web Title: CoronaVirus: shock to Udgir! Four positives in contact with a corona positive dead woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.