coronavirus : लातूर शहरातील मोतीनगर भागात एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:11 IST2020-05-28T21:10:53+5:302020-05-28T21:11:53+5:30

२ अहवाल प्रलंबित

coronavirus: one corona positive person found in Motinagar area of Latur city | coronavirus : लातूर शहरातील मोतीनगर भागात एक पॉझिटिव्ह

coronavirus : लातूर शहरातील मोतीनगर भागात एक पॉझिटिव्ह

लातूर : जिल्ह्यात गुरुवारी ५९ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५६ अहवाल निगेटिव्ह आले असून, पुन्हा १ व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे. तर २ अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले आहेत. आता लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख ११९ वर पोहोचला आहे. गुरुवारी आढळलेला बाधित रुग्ण शहरातील मोती नगर येथील रहिवासी असून, लातूरच्या विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, उदगीर ८, चाकूर ३, अहमदपूर ९, जळकोट येथील ५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर लातूर येथील कोविड केअर सेंटर येथून ८ व्यक्तींपैकी ६ निगेटिव्ह असून, २ व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आहेत. जिल्ह्यातील ५९ स्वॅबपैकी ५६ निगेटिव्ह आणि एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

Web Title: coronavirus: one corona positive person found in Motinagar area of Latur city