CoronaVirus In Latur : उदगीरातील आणखी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:08 IST2020-07-06T11:07:21+5:302020-07-06T11:08:32+5:30
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या २४ वर पोहचली आहे.

CoronaVirus In Latur : उदगीरातील आणखी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू
लातूर : उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय कोरोना बधिताचा सोमवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या २४ वर पोहचली आहे.
सदरील रुग्ण उदगीर तालुक्यातील हाळी येथील असून, २८ जून रोजी सदरील रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्याला उच्च रक्तदाब होता. दरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत ५१६० जणांच्या स्वबची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ४६२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच ४५२ जण बाधित आढळले आहेत. त्यातील २४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १८८ आहे.