शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Latur : जिल्ह्यात आणखी ६४ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 16:50 IST

९७३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील ४७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्दे १३ जणांची कोरोनावर मात : १०७ अहवाल प्रलंबित

लातूर : जिल्ह्यात गुरुवारी तपासण्यात आलेल्या ४६२ स्वॅबपैकी ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आणखी १०७ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, शुक्रवारी १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४५२ पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी ४६२ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, १०७ प्रलंबित आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लातूर तालुक्यातील २०, निलंगा १२, चाकूर ८, उदगीर १२, देवणी ३, औसा ६ आणि अहमदपूर तालुक्यातील ३ अशा एकूण ६४ जणांचा समावेश आहे. लातूरनजिक असलेल्या सीआरपीएफ कॅम्प येथील ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर लातूर शहरात पठाण नगर, शाम नगर, गुमास्ता कॉलनी, अहिल्यादेवी होळकर नगर, आदर्श कॉलनी, इस्लामपुरा, माताजी नगर, गुळटेकडी जुना औसा रोड, गवळी गल्ली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ६११ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९७३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील ४७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४५२ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

१३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी...रुग्णसंख्या वाढत असली, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे. आतापर्यंत ४७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या १० रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली असल्याने त्यांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. तसेच कोविड केअर सेंटर उदगीर, कोविड केअर सेंटर दापका ता. निलंगा आणि १ हजार मुला-मुलींचे वसतिगृह कोविड केअर सेंटर एमआयडीसी येथील प्रत्येकी एकाने कोरोनावर मात केली आहे. एकूण १३ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून सुटी मिळाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर