coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखीन पाच रूग्ण पॉझिटिव्ह; सहा जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 21:27 IST2020-06-20T21:27:34+5:302020-06-20T21:27:57+5:30

सध्या रूग्णालयात ६७ अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. तर १४६ जणांनी कोरोनावर मात केली

coronavirus: Five more patients tested positive in Latur district; Six beat the corona | coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखीन पाच रूग्ण पॉझिटिव्ह; सहा जणांची कोरोनावर मात

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखीन पाच रूग्ण पॉझिटिव्ह; सहा जणांची कोरोनावर मात

लातूर : जिल्ह्यात शनिवारी पाच कोरोनाबाधित नवे रूग्ण आढळले असून, सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे़ आता जिल्ह्याच्या कोरोनाबाधिताचा आलेख २२६ वर पोहोचला असून, सध्या रूग्णालयात ६७ अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. तर १४६ जणांनी कोरोनावर मात केली असून, १३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शनिवारी १०९ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, चौघांचे अहवाल अनिर्णीत ठेवण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये मोतीनगर - १, अजिंक्य सिटी- १, शाम नगर- १ आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील- १ तर औसा तालुक्यातील माळकोंडजी येथील एका रूग्णाचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: Five more patients tested positive in Latur district; Six beat the corona