शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

coronavirus : आनंददायक ! १० पॉझिटिव्ह मातांच्यापोटी निगेटिव्ह गोंडस बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 2:10 PM

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत यशस्वी उपचार

ठळक मुद्दे३१ गरोदर मातांना नकळतपणे कोरोनाचा संसर्ग१५ गरोदर माता कोरोनामुक्त 

- हरी मोकाशे

लातूर : कोरोनामुळे प्रत्येकजण सुरक्षेसाठी अंतर ठेवून राहत आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत गरोदर मातांची तर घालमेलच होत आहे. काळजी घेऊनही ३१ गरोदर मातांना नकळतपणे कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्यांच्यावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत यशस्वी उपचार करण्यात आल्याने १० पॉझिटिव्ह मातांनी निगेटिव्ह गोंडस बाळांना जन्म दिला आहे, तर १५ माता कोरोनामुक्त झाल्या आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ७२५ खाटा असून अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत असल्याने जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. कोरोनाच्या संकटामुळे तर उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या आणखीन वाढली आहे. या वैद्यकीय संस्थेत लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत ४ हजार ६२७ गरोदर मातांनी सुरक्षित बाळंतपणासाठी उपचार घेतले आहेत. त्यातील २ हजार ४४ मातांची नैसर्गिक तर १ हजार ४१५ मातांवर प्रसूतीसाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

सुरुवातीस बाळंतपणासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या मातांची कोरोना चाचणी करण्यात येत असे. आता कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास सुरक्षेसाठी म्हणून ही चाचणी केली जात आहे. दरम्यान चार महिन्याच्या कालावधीत उपचारासाठी आलेल्यांपैकी ३१ गरोदर मातांना नकळतपणे कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यातील बहुतांश मातांना धक्काच बसला. अशा परिस्थितीत स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक व पथक प्रमुख डॉ. भाऊराव यादव, डॉ. अण्णासाहेब बिरादार, डॉ. अनिता पवार, डॉ. शीतल लाड, डॉ. गणेश बंदखडके, डॉ. विष्णू तरसे यांनी आणि कोरोना विलगीकरण कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करण्याबरोबरच समुपदेशन केले. त्यामुळे २५ माता कोरोनामुक्त झाल्या. यातील १० माता कोरोनाग्रस्त असतानाच त्या बाळंत होऊन निगेटिव्ह गोंडस बाळांना जन्म दिला.

गुंतागुंतीच्या ९०८ मातांवर उपचार...जिल्ह्याबरोबरच उस्मानाबाद, उमरगा व अन्य काही ठिकाणच्या गरोदर मातांचे बाळंतपण हे गुंतागुंतीचे असल्याने त्यांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली असल्याची माहिती स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगला शिंदे, सहयोगी प्राध्यापक व पथक प्रमुख डॉ. भाऊराव यादव यांनी दिली.

घरातील मंडळींचा आनंद गगनात मावेना...प्रसूतीसाठी वैद्यकीय संस्थेत आलेल्या गरोदर महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या सर्व कुटुंबियांना धक्काच बसला होता. अशा परिस्थितीत औषधोपचार देण्याबरोबर त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सातत्याने समुपदेशन करण्यात आले. कोरोनाग्रस्त असतानाच त्यांची प्रसूती झाली. एकीकडे बाळ झाल्याचा आनंद तर दुसरीकडे कोरोनामुळे चिंता अशी स्थिती होती. उपचारानंतर त्या कोरोनामुक्त झाल्या आणि निगेटिव्ह बाळासह कोरोनामुक्त मातांना घरापर्यंत सोडण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlaturलातूरpregnant womanगर्भवती महिला