Coronavirus : कोरोनामुळे लातूर जिल्ह्यात आणखी दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 20:50 IST2020-06-15T20:49:38+5:302020-06-15T20:50:00+5:30

आतापर्यंत जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. 

coronavirus : Corona killed two more in Latur district | Coronavirus : कोरोनामुळे लातूर जिल्ह्यात आणखी दोघांचा बळी

Coronavirus : कोरोनामुळे लातूर जिल्ह्यात आणखी दोघांचा बळी

लातूर : कोरोनामुळे लातूर जिल्ह्यात सोमवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील एकजण लातूर शहरातील खाडगाव रोड परिसरातील असून, दुसरा उदगीर शहरातील शेल्हाळ रोड नूर पटेल कॉलनी परिसरातील रहिवासी होता. आतापर्यंत जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. 

लातूर शहरातील खाडगाव रोड परिसरातील बाबा नगरातील ३३ वर्षीय रुग्ण ९ जून रोजी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला मुंबई प्रवासाचा इतिहास होता. पाच वर्षांपूर्वी सदर रुग्णास किडनी ट्रान्सप्लांट केली होती. त्यामुळे हा रुग्ण डायलिसीसवर होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अखेर सोमवारी उपचारादरम्यान ४.४० वाजण्याच्या सुमारास या रुग्णाचे निधन झाले. 

दरम्यान, शेल्हाळ रोड नूर पटेल कॉलनी उदगीर येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.  सदर रुग्ण उदगीर उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी दाखल झाला होता. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच हृदयाचा आजार होता. अ‍ॅन्जिओप्लास्टीही झाली होती. त्यात उपचारादरम्यान सोमवारी या रुग्णाचा मृत्यू झाला. उदगीरमधील कोरोनाचा हा पाचवा बळी असून, जिल्ह्यात १० रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.

Web Title: coronavirus : Corona killed two more in Latur district