coronavirus : लातूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 07:15 AM2020-03-28T07:15:50+5:302020-03-28T07:17:22+5:30

आतापर्यंत ५० पैकी ५० अहवाल निगेटिव्ह आले असून ही बातमी दिलासादायक आहे. दरम्यान सर्व अहवाल निगेटिव्ह असले तरी लोकांनी घराबाहेर पडू नये

coronavirus: , Collector G. Srikanth said, There is no corona infected person in Latur district | coronavirus : लातूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची माहिती

coronavirus : लातूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची माहिती

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील उर्वरित सात अहवालही निगेटिव्ह आले असून अद्यापि जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही. आतापर्यंत ५० पैकी ५० अहवाल निगेटिव्ह आले असून ही बातमी दिलासादायक आहे. 
दरम्यान सर्व अहवाल निगेटिव्ह असले तरी लोकांनी घराबाहेर पडू नये, पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत. काळीज घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे. किराणा तसेच अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. काही दुकाने २४ तास सुरू ठेवण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे गर्दी करू नये, असेही जी. श्रीकांत म्हणाले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ राजेंद्र माने म्हणाले, संचारबंदीत अकारण कोणी फिरल्यास कारवाई होईल. लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज, जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे, अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ परगे यांनी सर्व यंत्रणा रुग्ण सेवेत आहेत, डॉक्टर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, तुम्ही घराबाहेर पडू नका असे आवाहनही जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे.

Web Title: coronavirus: , Collector G. Srikanth said, There is no corona infected person in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.