coronavirus : उदगीर शहरात आणखी एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:43 IST2020-06-08T19:42:24+5:302020-06-08T19:43:52+5:30
लातूर जिल्ह्यातील २८ पैकी २२ निगेटिव्ह, ३ अनिर्णित, १ स्वॅब परिपूर्ण नसल्याने रद्द

coronavirus : उदगीर शहरात आणखी एक पॉझिटिव्ह
लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळेत सोमवारी तपासण्यात आलेल्या २८ व्यक्तींच्या स्वॅबपैकी २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ३ अनिर्णित, १ स्वॅब परिपूर्ण नसल्यामुळे रद्द तर १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्ण उदगीर उपजिल्हा रुग्णालयात दाखल असून, शहरातील आझाद नगरातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे.
सोमवारी जिल्ह्यातील २८ स्वॅबची तपासणी झाली. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १३ व्यक्तींपैकी ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित असून, एका व्यक्तीचा स्वॅब परिपूर्ण नसल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथून १३ व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी १० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, दोन व्यक्तींचे अहवाल अनिर्णित असून, एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्ण यापूर्वी आझाद नगरात बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.