Coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 21:34 IST2020-06-07T21:34:20+5:302020-06-07T21:34:48+5:30
मुंबईवरून औसा येथे परतलेला व्यक्ती पॉझिटिव्ह

Coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी एक पॉझिटिव्ह
लातूर : जिल्ह्यात रविवारी एकूण २५ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, २४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सदर रुग्ण औसा तालुक्यातील यल्लोरीचा रहिवासी असून, मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख १४८ वर पोहोचला असून, यातील १११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३३ रुग्ण उपचार घेत आहेत.