Coronavirus :लातूर जिल्ह्यात ८ कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 23:04 IST2020-07-03T23:03:30+5:302020-07-03T23:04:40+5:30

शुक्रवारी २१३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली.

Coronavirus: Addition of 8 coronavirus patients in Latur district | Coronavirus :लातूर जिल्ह्यात ८ कोरोनाबाधितांची भर

Coronavirus :लातूर जिल्ह्यात ८ कोरोनाबाधितांची भर

लातूर : लातूर जिल्ह्यात शुक्रवारी ८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, आता कोरोना बाधितांचा आलेख ४०८ वर पोहोचला आहे. दरम्यान, उदगीर येथे एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, शुक्रवारी ९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी २१३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ८ पॉझिटिव्ह, ९ अनिर्णित तर एक स्वॅब परिपूर्ण नसल्याने रद्द करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये उदगीर तालुक्यातील १, महानगरपालिका अंतर्गत ३, औसा २, निलंगा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती प्रयोगशाळेचे सहायक प्रा. डॉ. वर्षा कलशेट्टी यांनी दिली.

Web Title: Coronavirus: Addition of 8 coronavirus patients in Latur district