coronavirus : औसा तालुक्यात ७ तर लातूर शहरात २ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 21:16 IST2020-06-21T21:16:14+5:302020-06-21T21:16:46+5:30

तीन रुग्णांनी केली कोरोनावर मात

coronavirus: 7 new patients in Ausa and 2 new patients in Latur city | coronavirus : औसा तालुक्यात ७ तर लातूर शहरात २ नवे रुग्ण

coronavirus : औसा तालुक्यात ७ तर लातूर शहरात २ नवे रुग्ण

लातूर : लातूर जिल्ह्यात रविवारी पुन्हा ९ रुग्ण आढळले असून, यात लातूर शहरातील २ तर औसा तालुक्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख २३५ वर पोहोचला असून, सद्य:स्थितीत ७३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर रविवारी ३ रुग्णांना सुटी मिळाली असून, आतापर्यंत १४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी १३१ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ९ पॉझिटिव्ह आले आहेत. तर १० जणांचे अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले आहेत.

Web Title: coronavirus: 7 new patients in Ausa and 2 new patients in Latur city