coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ७ पॉझिटिव्ह; दोघांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 20:49 IST2020-06-18T20:49:10+5:302020-06-18T20:49:31+5:30
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये ६ रुग्ण लातूर शहरातील असून, १ उदगीर येथील आहे.

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ७ पॉझिटिव्ह; दोघांना सुटी
लातूर : लातूर जिल्ह्यात गुरुवारी आणखी ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, आता कोरोना बाधितांचा आलेख २१८ वर पोहोचला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये ६ रुग्ण लातूर शहरातील असून, १ उदगीर येथील आहे.
दरम्यान, गुरुवारी एकूण १२७ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ पॉझिटिव्ह, ८ व्यक्तींचे अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले असून, ११२ अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजयकुमार चिंचोलकर यांनी दिली.
दरम्यान, लातूरच्या रुग्णालयात दाखल असलेल्या कामखेडा येथील दोन रुग्णांना सुटी मिळाली आहे. गेल्या १२ दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. गजानन हलकंचे, कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. निलिमा देशपांडे यांनी दिली.