coronavirus : 4,000 doctors to be available in Corona: Amit Deshmukh | coronavirus : कोरोनात ४ हजार डॉक्टर्स राज्यामध्ये उपलब्ध होणार : अमित देशमुख

coronavirus : कोरोनात ४ हजार डॉक्टर्स राज्यामध्ये उपलब्ध होणार : अमित देशमुख

लातूर : राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतून फेब्रुवारी २०१९ मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या तसेच इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. डॉक्टरांची कमतरता भासत असल्यामुळे हा निर्णय घेतला असून, यामुळे ४ हजार डॉक्टर्स कोविड-१९ वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. 

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०१९ मध्ये घोषित करण्यात आला होता. यात जवळपास ४ हजार विद्यार्थी एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांची इंटर्नशिप १ मार्च २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२० दरम्यान पूर्ण झाली आहे. इंटर्नशिप पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पदवीदान समारंभाची तारीख अद्याप निश्चित नाही. पदवीदान समारंभाची वाट न पाहता विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. जेणेकरून हे विद्यार्थी सेवेत दाखल होण्यास पात्र ठरणार आहेत. देशमुख यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना या अनुषंगाने सूचना केल्या आहेत. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या डॉक्टरांच्या सेवा वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.

Web Title: coronavirus : 4,000 doctors to be available in Corona: Amit Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.