coronavirus : लातूर जिल्ह्यात ३४ रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:07 IST2020-07-01T23:06:50+5:302020-07-01T23:07:41+5:30

बुधवारी १८४ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली.

coronavirus: 34 patients increased in Latur district | coronavirus : लातूर जिल्ह्यात ३४ रुग्ण वाढले

coronavirus : लातूर जिल्ह्यात ३४ रुग्ण वाढले

लातूर : जिल्ह्यात बुधवारी ३४ रुग्ण वाढले असून, आता कोरोना बाधितांचा आलेख ३८८ वर पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारी ४ रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी १८४ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ३४ पॉझिटिव्ह आले आहेत. तर दहा जणांचा अहवाल अनिर्णित ठेवण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये लातूर तालुक्यातील १२, औसा १७, उदगीर २ आणि अहमदपूर तालुक्यातील तिघांचा समावेश आहे, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे सहयोगी प्रा. डॉ. नामदेव सूर्यवंशी यांनी दिली.

Web Title: coronavirus: 34 patients increased in Latur district