coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी १७ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 22:30 IST2020-06-28T22:30:33+5:302020-06-28T22:30:57+5:30
कोरोना बाधितांचा आलेख ३२६ वर पोहोचला आहे.

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी १७ रुग्णांची भर
लातूर : जिल्ह्यात रविवारी आणखी १७ रुग्णांची भर पडली असून, आता कोरोना बाधितांचा आलेख ३२६ वर पोहोचला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत १८९ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी झाली. त्यापैकी १६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, १७ पॉझिटिव्ह आले आहेत. लातूर शहरात १० रुग्ण आढळले असून,
उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथून ६६ स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी ५९ अहवाल निगेटिव्ह आले असून, ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर अहमदपूर ९ पैकी ९ आणि चाकूर येथील घेण्यात आलेल्या एका व्यक्तीचा स्वॅब निगेटिव्ह आला असल्याची माहिती प्रयोगशाळेचे प्रमुख विजयकुमार चिंचोलकर यांनी दिली.