coronavirus : लातूर जिल्ह्यात १५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:36 IST2020-07-02T22:36:18+5:302020-07-02T22:36:54+5:30

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४०२ वर पोहोचली आहे.

coronavirus: 15 positive in Latur district; Death of one | coronavirus : लातूर जिल्ह्यात १५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

coronavirus : लातूर जिल्ह्यात १५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

लातूर : येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत गुरुवारी १३६ स्वॅब तपासण्यात आले. त्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर १०७ जण निगेटिव्ह आहेत. शिवाय, गुरुवारी एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४०२ वर पोहोचली असून, आतापर्यंत १९ मृत्यू झाले आहेत. तीन रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यात एक रुग्ण १३ दिवस व्हेंटिलेटरवर होता. त्या रुग्णाला मधुमेह आजार असतानाही त्याने कोरोनावर मात केली आहे.

Web Title: coronavirus: 15 positive in Latur district; Death of one