coronavirus : लातूर जिल्ह्यात १३ कोरोना रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:49 IST2020-06-29T21:49:16+5:302020-06-29T21:49:37+5:30
कोरोना बाधितांचा आलेख ३३९ वर पोहोचला आहे.

coronavirus : लातूर जिल्ह्यात १३ कोरोना रुग्ण वाढले
लातूर : जिल्ह्यात सोमवारी आणखी १३ रुग्ण वाढले असून, आता कोरोना बाधितांचा आलेख ३३९ वर पोहोचला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत सोमवारी १७९ स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, १३ पॉझिटिव्ह आले आहेत. तर ११ अनिर्णित असून, १२ स्वॅब परिपूर्ण नसल्याने रद्द करण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लातूर महानगरपालिकेअंतर्गत २, व्हीडीजीआयएमएस संस्थेअंतर्गत ४, औसा तालुक्यातील ६ आणि उदगीर तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
लातूर शहरातील मोती नगर, झिंगणअप्पा गल्ली तसेच बीदर जिल्ह्यातील हुसनाळ येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून, रुग्णांचा निवासस्थान परिसर आरोग्य विभागाच्या वतीने सील करण्यात आला आहे.