coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 21:12 IST2020-06-16T21:12:32+5:302020-06-16T21:12:56+5:30
मंगळवारी लातूरच्या शासकीय रुग्णालयातील दोघांना सुटी देण्यात आली

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण
लातूर : लातूर जिल्ह्यात आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, आता कोरोना बाधितांचा आलेख २०८ वर पोहोचला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये लातूर शहरातील २, उदगीर तालुक्यातील ५, निलंगा येथील १ आणि औसा तालुक्यातील २ अशा एकूण १० जणांचा समावेश आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत मंगळवारी जिल्ह्यातील एकूण ९३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी झाली. त्यापैकी ८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, दोघा जणांचे अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले आहेत. तर १० पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, मंगळवारी लातूरच्या शासकीय रुग्णालयातील दोघांना सुटी देण्यात आली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.