कोरोना योध्द्यांचा सन्मान, रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:43+5:302021-05-31T04:15:43+5:30
आ. कराड यांनी हारतुरे, सत्कार, बॅनरवरील खर्च टाळून कोरोना संबंधित विधायक कार्य कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी करावे, असे सूचित केले ...

कोरोना योध्द्यांचा सन्मान, रक्तदान शिबिर
आ. कराड यांनी हारतुरे, सत्कार, बॅनरवरील खर्च टाळून कोरोना संबंधित विधायक कार्य कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी करावे, असे सूचित केले होते. त्यानुसार लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रेणापूर आणि मुरुड ग्रामीण रुग्णालयासह पोहरेगाव, बिटरगाव, खरोळा, कारेपूर, पानगाव, निवळी, चिंचोली ब., तांदुळजा, जवळा बु., चिखुर्डा, भातांगळी, बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह बावची येथील कोविड सेंटर आदी ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण सहायक, आरोग्य सेवक, वाहन चालक, सेवक, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक आदींचा साडी, चोळी, मास्क, सॅनिटायझर देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळात मृत्यू पावलेल्या रुग्णांचा लातूरच्या खाडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचा विधी करणाऱ्या अंत्यविधी पथकाचाही कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
आ. कराड यांना जन्मदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीया, आ. सुजितसिंह ठाकुर, माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, खा. ओमराजे निंबाळकर, खा. सुधाकर शृंगारे, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. गोपीचंद पडळकर, गोविंदअण्णा केंद्रे आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
संपर्क कार्यालयात आ. कराड यांना आ. अभिमन्यू पवार, भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी खा. डॉ. सुनील गायकवाड, माजी आ. विनायकराव पाटील, जि.प. सभापती रोहिदास वाघमारे, संगीताताई घुले, शैलेश गोजमगुंडे, सुधीर धुत्तेकर, प्रदीप पाटील खंडापूरकर, जयंत काथवटे, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, भाजयुमोचे अजित पाटील कव्हेकर, माजी सभापती दिलीपराव देशमुख, त्र्यंबक गुट्टे, अशोक केंद्रे, दिग्विजय काथवटे, रामचंद्र तिरुके, देवीदास काळे, डॉ. बाबासाहेब घुले, अजित माने, अनिल भिसे, रमेश सोनवणे, अनंत चव्हाण, जमुनाबाई बडे आदींनी शुभेच्छा दिल्या.