शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

Corona Virus : लातूर जिल्ह्यात ६४१ बाधित रुग्ण; पॉझिटिव्हिटी रेट १४.६ टक्के!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 19:51 IST

Corona Virus in Latur district : सद्य:स्थितीत ५ हजार ४१७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी उपचारादरम्यान २९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

ठळक मुद्देविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत १५०८ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात २१४ पॉझिटिव्ह आढळले, तर २९१९ व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली.

लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, जिल्ह्यात बुधवारी ४ हजार ४२७ व्यक्तींच्या चाचण्यांमध्ये ६४१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आता बाधितांचा आलेख ८६ हजार ३०२ वर पोहोचला असून, यातील ७९ हजार २३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत ५ हजार ४१७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी उपचारादरम्यान २९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत १५०८ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात २१४ पॉझिटिव्ह आढळले, तर २९१९ व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ४२७ रुग्ण आढळले असून, दोन्ही चाचण्या मिळून ६४१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, उपचारादरम्यान २९ जणांचा मृत्यू झाला. त्यात दहा जणांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त होते. अकरा जणांना कोरोनासह अन्य व्याधी होत्या. तर आठ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी होते, असे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले. 

सध्या उपचार घेत असलेल्या ५ हजार ४१७ रुग्णांपैकी ४१८ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ३४ रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. तर ३१३ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असून, ९४९ रुग्ण मध्यम परंतु, ऑक्सिजनवर आहेत. ३४४ रुग्णांमध्ये मध्यम लक्षणे असली तरी विनाऑक्सिजनवर असून ३७७७ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. ५४१७ रुग्णांपैकी ३२२१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर २१९६ रुग्ण कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात दाखल असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी दिली.

९२२ जण कोरोनामुक्तबुधवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ९२२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ८१२, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३३, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ९, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील १८, औसा, अहमदपूर ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येकी २, बाभळगाव ग्रामीण रुग्णालयातील १, कासारशिरसी येथील २, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील २२ अशा एकूण ९२२ जणांनी कोरोनावर मात केली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसlaturलातूर