जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शिक्षकांच्या कोरोना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST2021-01-21T04:18:25+5:302021-01-21T04:18:25+5:30
प्राथमिक केंद्रात चाचण्यांना प्रारंभ... शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाने आरोग्यधिकारी यांना पत्र ...

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शिक्षकांच्या कोरोना टेस्ट
प्राथमिक केंद्रात चाचण्यांना प्रारंभ...
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाने आरोग्यधिकारी यांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार प्राथमिक केंद्रात शिक्षकांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. तसेच शाळांचे निर्जंतुकीकरण केले जात असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनानांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. पाचवी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांची संख्या जवळपास ४ हजार ३०० असून, शाळांची संख्या ९११ असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
नियमांचे पालन...
कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विशेष लक्ष आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण, मास्क, सॅनिटायझर, फिजीकल डिस्टन्स, थर्मल स्क्रिनिंग आदी उपाययोजना बंधनकारक राहणार आहेत. शिक्षकांच्या चाचण्यास प्रारंभ झाला असून, २७ जानेवारीपासून नियमित वर्ग सुरु होतील.
- विशाल दशवंत, उपशिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या...
पाचवी - ४९,२१५
सहावी - ४८४९९
सातवी - ४९६३७
आठवी - ४९२३९
जिल्ह्यातील शाळांची संख्या - ९११
जिल्ह्यातील शिक्षक संख्या - ४३००