कोरोनामुळे राखी पोर्णिमेलाही प्रवाशांचा प्रतिसाद मंदावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:28+5:302021-08-21T04:24:28+5:30

अहमदपूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी यंदा राखी पौर्णिमेला प्रवाशांचा प्रतिसाद अल्पच आहे. अहमदपूरहून बाहेरगावी जाणाऱ्या असो ...

Corona slows down passenger response to Rakhi Purnima too! | कोरोनामुळे राखी पोर्णिमेलाही प्रवाशांचा प्रतिसाद मंदावला !

कोरोनामुळे राखी पोर्णिमेलाही प्रवाशांचा प्रतिसाद मंदावला !

अहमदपूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी यंदा राखी पौर्णिमेला प्रवाशांचा प्रतिसाद अल्पच आहे. अहमदपूरहून बाहेरगावी जाणाऱ्या असो की बाहेरगावावरून अहमदपूरला येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला प्रवासीच मिळत नाहीत. त्यामुळे एकूण बसेसच्या संख्येत निम्मेच बस नियमित धावत असून त्यादेखील पूर्ण क्षमतेने धावत नाहीत. त्यामुळे काही वेळा डिझेलचा खर्च निघणेही अवघड झालेले आहे.

प्रवासी आकर्षित करण्यासाठी पूर्वीपेक्षा भाड्यात कपात करण्यात आली आहे. बस रस्त्यावर धावायला लागली म्हणजे टॅक्स भरावाच लागतो. मग प्रवासी मिळो अथवा ना मिळो. राखी पौर्णिमा जवळ आली तरी प्रवासी संख्या वाढत नाही. ना बहिणी प्रवास करीत आहेत, ना भाऊ. कोरोनामुळे बहुतांश बहिणी ऑनलाईन पद्धतीने राखी पाठवून रक्षाबंधन साजरे करीत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे सणासुदीच्या दिवसातही ट्रॅव्हल्स चालकांना फटका सहन करावा लागत आहे.

या मार्गावर धावतात ट्रॅव्हल्स...

अहमदपूर -मुंबई ४००-५५०

अहमदपूर- नागपूर ६०० - ८००

अहमदपूर- पूणे ३००-५००

अहमदपूर- औरंगाबाद ४५०-५००

अहमदपूर - कोल्हापूर

- ६००-९००

ट्रॅव्हल्सची संख्या घटली...

अहमदपूरातून मुंबईसाठी १०, पुण्यासाठी १५, औरंगाबाद -१, कोल्हापूर -७, नागपूर ५ अशा बसेस रोज धावतात. आता ही संख्या कमी झाली आहे. त्यात देखील प्रवाशी मोजकेच असतात. त्यामुळे भाड्यातही कपात करण्यात आली आहे. तरी देखील प्रवाशांचा प्रतिसाद नाही. प्रवाशांअभावी निम्मेपेक्षा जास्त ट्रॅव्हल्स बस घरीच उभ्या आहेत.

इंधन दरवाढीमुळे व्यवसायात तोटा...

पूर्वी ऑईलचे भाव २०० रुपये होते, आता ६०० रुपये आहे. डिझेलचे दर वाढूनही भाड्यात फक्त ५० रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनामुळे तर प्रवासीच मिळत नाही. कधी कधी तर निम्मेही प्रवासी नसतात. एकीकडून बस रिकामीच धावते.

नंदकिशोर निला - ट्रॅव्हल्स बस मालक

Web Title: Corona slows down passenger response to Rakhi Purnima too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.