गणेशोत्सवात कोरोना नियमांचे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:22+5:302021-09-09T04:25:22+5:30

गेल्या दीड वर्षापासून आपण सर्वजण कोरोना संसर्गाला सामोरे जात आहोत. कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरतांना दिसून येत आहे. मात्र, ...

Corona rules should be followed in Ganeshotsav | गणेशोत्सवात कोरोना नियमांचे पालन करावे

गणेशोत्सवात कोरोना नियमांचे पालन करावे

गेल्या दीड वर्षापासून आपण सर्वजण कोरोना संसर्गाला सामोरे जात आहोत. कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरतांना दिसून येत आहे. मात्र, या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या नातेवाईकांसह जवळच्यांना गमावलेले आहे. दुसरी लाट ओसरत असतांनाच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. या दरम्यान सर्वांसाठीच पर्वणी असणारा गणेशोत्सव सुरू होत आहे. राज्यभरात प्रत्येकजण आपल्या घरात श्रीगणेशाची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी होतात. राज्याला सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे. जिल्ह्यातील गणेशोत्सव सार्वजनिकरित्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेऊन प्रत्येकाने काळजी घेत आपली जबाबदारी ओळखणे क्रमप्राप्त आहे. कोणत्याही उत्सवाला माणसांशिवाय शोभा नाही. विशेषकरून गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. २०२१चा गणेशोत्सव साजरा करताना सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास आपण सर्वजण मिळून २०२२चा गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करू, अशी अपेक्षा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Corona rules should be followed in Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.