Corona In Latur : अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी ओळखपत्र बाळगावे : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 11:26 IST2020-03-26T11:24:39+5:302020-03-26T11:26:23+5:30
भाजी, दूध विक्रेते यांना कोणी अडवणार नाही

Corona In Latur : अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी ओळखपत्र बाळगावे : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने
ठळक मुद्देशहरात ठिकठिकाणी नाकाबंदी
लातूर : शासकीय, खाजगी रुग्णालय कर्मचारी, बँक कर्मचारी, पत्रकार यांनी सोबत ओळखपत्र बाळगावे तसेच भाजी, दूध विक्रेते यांना कोणी अडवणार नाही असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ राजेंद्र माने यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात ठिकणठिकाणी नाकाबंदी आहे. संचारबंदी आदेशाचे पालन करा. अत्यावश्यक सेवा, किराणा वाहतूक, दूध, भाजी, पाणी वाहतूक याला बंदी नाही. पोलिसांना तशा सूचना आहेत. परंतु औषध, भाजी विक्रेत्यांनी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. लोकांना तीन फूट दूर ठेवावे, मनपा आखणी करून देईल. तोंपर्यंत सर्वांनी खबरदारी घ्यावी, गर्दी टाळावी, असे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे.