लातूर महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचे वाघमारे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 11:44 IST2020-01-10T11:43:04+5:302020-01-10T11:44:31+5:30

'प्रभाग ११ अ' मध्ये  विकास वाघमारे यांचा ७२६ मतांनी विजय

Congress's vikas Waghmare wins Latur municipal by-election | लातूर महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचे वाघमारे विजयी

लातूर महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचे वाघमारे विजयी

लातूर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ अ च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विकास वाघमारे हे ७२६ मतांनी विजयी झाले आहेत. पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले होते. यावेळी ३३.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून विकास वाघमारे, भाजपकडून निखिल गायकवाड, वंचितचे सुजाता अजनिकर, तर अपक्ष अमोल कांबळे, सचिन कांबळे यांनी उमेदवारी दाखल केली होती. शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सहा टेबलावर मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास वाघमारे यांनी ७२६ मतांनी विजयी मिळवला. 

Web Title: Congress's vikas Waghmare wins Latur municipal by-election