पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST2021-07-14T04:22:52+5:302021-07-14T04:22:52+5:30
लातूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्यावतीने सोमवारी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. उषाकिरण पेट्रोलपंपाजवळ झालेल्या ...

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
लातूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्यावतीने सोमवारी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. उषाकिरण पेट्रोलपंपाजवळ झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने उच्चांक गाठला आहे. यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. केंद्र शासनाच्या धोरणामुळे ही महागाई वाढली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात अनुसूचित जाती विभागाचे मराठवाडा समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. बाबासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, प्रशांत पवार, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सुभाष घोडके, जयंतराव काथवटे, सुनीता आरळीकर, मोहन सुरवसे, हकिमभाई शेख, महेश काळे, ॲड. देविदास बोरुळे-पाटील, रत्नदीप अजनीकर, श्यामराव सूर्यवंशी, प्रा. सुधीर अनवले, संजय ओव्हळ, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, एकनाथ पाटील, एम. पी. देशमुख, ज्ञानेश्वर सुगावे, सुरेश चव्हाण, राजेसाहेब सवाई आदी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरवाढीवर केंद्र सरकार गंभीर नाही
केंद्र सरकार इंधन दरवाढीवर गंभीर नाही. त्यामुळे शासनाला जागे करण्यसाठी काँग्रेस पक्षाने आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनात सर्वसामान्य जनताही उतरत आहे. शासनाने ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही अनुसूचित जाती विभागाच्यावतीने करण्यात आली.